पहलगाम दहशतवादी हल्ला मुंब्र्यात दहशतवाद्यांच्या पुतळ्याला दिली फाशी दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली

संवाददाता : तौफ़ीक़ 
ठाणे - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली. 

काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा - अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, एमएसपी केअर फाऊंडेशन यांच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच, दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली. 
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाही. येथे मृत्यू स्वस्त झाले आहेत. आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनास जाऊ शकत नाही. ही शोकांतिका असून त्यास सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे. सर्वात दुर्देवी म्हणजे, दहशतवादी हल्ल्यात हिंदू, मुस्लीम धर्मियांसह अन्य धर्मिय लोकही मारले गेले आहेत. तरीही, गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे, हे अतिशय वाईट आहे. हिंदू धर्म ज्या प्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही. त्याचप्रमाणे इस्लामदेखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही. अन् असे कृत्य करणाऱ्यास घरात घुसून मारले पाहिजे. आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधाने करीत आहेत. त्याकडे पाहता, सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकावयाचे आहेत, असेच चित्र दिसत आहे. त्याचा निषेध तर आम्ही करतोच पण जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत. त्यांनाही फाशी दिले पाहिजे, अशी मागणी केली. 

या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
P